शरण शरण एकनाथा । पायी माथा ठेविला ॥१॥नका पाहु गुण दोष । झालो दास पायांचा ॥२॥आता मज उपेक्षिता । नाही सत्ता आपुली ॥३॥तुका म्हणे भागवत । केले श्रॄत सकळा ॥४॥
Home
Feed
Search
Library
Download